आहाच तो मोड वाळलियाम
1381.
आहाच तो मोड वाळलियामधी । अधीराची बुद्धि तेणे न्याये ॥१॥
म्हणऊनि संग न करी दुसरे । चित्त मळीन द्वारे दोड पडे ॥धृपद॥
विषासाठी सर्पा भयाभीत लोक । हे तो सकळीक जाणतसा ॥२॥
तुका म्हणे काचे राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥३॥
अर्थ :
उगवलेले मोड जसे पाण्यावाचून वाळून गेल्यावर व्यर्थ ठरते त्या न्यायाने ज्याच्या अंगी धीर नाही त्याची बुद्धी व्यर्थ ठरते. म्हणून त्यामुळे इतर कोणाची संगतीन न करता संतांचे संगती करावी. जर आपण दुष्टांची संगती केली तर आपले चित्त मलीन होते. सर्पाच्या पोटी विष असते त्यामुळे सर्व लोक त्याला घाबरतात ही गोष्ट तर सर्वच लोक जाणतात. तुकाराम महाराज म्हणतात जे कच्चे लाकूड आहे ते कामी येत नाही म्हणजेच ज्याचा त्याचा अवगुन ज्याला त्याला बाधक ठरतो.
