हातात नरोटी जीण वस्त
1369.
हातात नरोटी जीण वस्त्र भार म्हणसी सवदागर संत माझे ॥१॥
परळ भोपळा गृहामाजी संपत्ति | भूषण का श्रीपती सांगतसा ॥२॥
भणंगाचे घरा नित्यची राजपट | सांगसी अचाट ब्रीद त्यांचे ॥३॥
कैकाडयाचे वानी करिती गुडगुड मजला है गूढ उमजेना ॥४॥
नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे | आम्हा अघोरवाणे दिसतसे ॥५॥
