वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

उद्धवा तू करी कीर्तन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086008 · अभंग क्र. १३७९

1379.
उद्धवा तू करी कीर्तन । अनन्यभावें माझे भजन । नको आणीक साधन । यापरतें सर्वथा ॥१॥
धरी प्रेम सदा वाचे । कीर्तनरंगीं तू नाचे । मी तू पण साचे । अंगी न धरी कांही ॥२॥
भोळे भोळे जन । गाती अनुदिनी कीर्तन । तेथे अधिष्ठान । माझे जाण सर्वथा ॥३॥
नको चुकू तया ठायी । वसे सर्वदा मीही । एका जनार्दनी पाही । किर्तनी वसे सर्वदा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग