म्हणोनिया शब्द न पवे
1368.
म्हणोनिया शब्द न पवेचि तत्वता ।
बुध्दीचिया माथा वळघे कोण ॥१॥
मना पवना केवि घडेल संचार ।
श्रुती परात्पर म्हणती ज्याते ॥२॥
नाद बिंदु कळा ज्योती ही बोलणी ।
आरौती निर्वाणी विरती तेथे ॥३॥
निळा म्हणे वर्म नेणती ते सकळे ।
वाचके वाचाळे संतावीण ॥४॥
