श्रीशंभुचें आराध्य द
1377.
श्रीशंभुचें आराध्य दैवत । क्षणी वैकुंठी क्षीरसागर । जयालागीं योगी तप तपती समस्त । तो सांपडला आम्हा कीर्तनरंगांत ॥१॥
धन्य धन्य कीर्तन भूमंडळी । महादोषा होतसे होळी । पूर्वज उद्धरती सकळीं । वाहता टाळी कीर्तनी ॥२॥
पार्वतीसी गुज सांगे आपण । शंकर राजा बोले वचन । माझे आराध्य दैवत जाण । कीर्तनरंगणीं उभे आहें ॥३॥
मी त्रिशूळ पाशुपत घेउनी करी । कीर्तनाभोंवतीं घिरटी करी । विघ्ना हाणोनि लाथा निवारी । रक्षी स्वये हरिदासां ॥४॥
त्याचे चरणींचें रज वंदी आपण । हे पार्वतीसी सांगे गृह्मा ज्ञान । एका जनार्दनी शरण । कीर्तनरंगी नाचतसें ॥५॥
