वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

तांतडीने आम्हा धीरचि

🙏 3. संत तुकाराम · ABH-079208 · अभंग क्र. १३८४

1384.
तांतडीने आम्हा धीरचि न कळे । पाळावे हे लळे लवलाही ॥१॥
नका काही पाहो सावकाशी देवा । करा एक हेवा तुमचा माझा ॥धृपद॥
वोरसाचा हेवा सांभाळावी प्रीत । नाही राहो येत अंगी धंदा ॥२॥
तुका म्हणे मज नका गोवू खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥३॥

अर्थ :
देवा तुमच्या भेटी करता आम्ही खूप तातडी करीत आहोत. आता आम्हाला धीर निघत नाही त्यामुळे तू आता आमचे लाड लवकर पुरव. देवा तुमच्या व माझ्या भेटीविषयी सावकाश पणा तुम्ही धरू नका आणि तुमच्या व माझ्या एकरूप पाणाविषयी तुम्ही मनामध्ये हेवा धरा. माझ्या प्रेमाचा सोस तुम्ही सांभाळा आणि आपल्यात भेद राहणार नाही असे करा. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला इतर कोणत्याही गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवून ठेवू नका कारण मी आनंदाच्या जेवणाची वेळ राखून ठेवले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग