वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

क्षणक्षणा जीवा वाटतस

🙏 3. संत तुकाराम · ABH-079040 · अभंग क्र. १३८२

1382.
क्षणक्षणा जीवा वाटतसे खंती । आठवती चित्ती पाय देवा ॥१॥
येई वो येई वो येई लवलाही । आलिंगुनि बाही क्षेम देई ॥धृपद॥
उताविळ मन पंथ अवलोकी । आठवती चुकी काय जाली ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडी वेगी ॥३॥

अर्थ :
देवा तुझ्या भेटी करता माझा जीव क्षणाक्षणाला खंत करत आहे. आणि माझ्या चित्तामध्ये मी तुझे पाय आठवीत आहे. त्यामुळे देवा तू ये, तू ये, तू लवकर ये आणि तुझे दोन्ही बाहू पसरून मला आलिंगन दे. देवा माझे मन तुझी आठवण करते आणि तुझ्या भेटी करता ते उताविळ झाले आहे. ज्याअर्थी तू मला लवकर भेट देत नाही त्याअर्थी माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे आणि तेच मी माझ्या चित्तात आठवीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझ्या जीवाचे जीवण आहे त्यामुळे तू माझा माझ्या भेटी करता लवकर उडी घाल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग