वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

कोण्या काळे येईल मना

🙏 3. संत तुकाराम · ABH-078913 · अभंग क्र. १३९१

1391.
कोण्या काळे येईल मना । नारायणा तुमचिया ॥१॥
माझा करणे अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥धृपद॥
लागलीये तळमळ चित्ता । तरी दुश्चिता संसारी ॥२॥
मुखाची च पाहे वास । मागे दास सांभाळी ॥३॥
इच्छा पूर्ण जाल्याविण । कैसा सीण वारेल ॥४॥
लाहो काया मने वाचा । दिवसाच्या भेटीचा ॥५॥
कंटाळा तो न धरावा । तुम्ही देवा दासांचा ॥६॥
तुका म्हणे माझे वेळे । न कळे का हे उफराटे ॥७॥

अर्थ :
हे नारायणा तुमच्या मनात असे केव्हा येईल की माझा अंगिकार करावा माझा सर्व भार फेडून टाकावा. माझ्या मनाला हीच एक तळमळ लागलेली आहे त्यामुळे संसाराविषयी दूश्चित मी झालेलो आहे. मी तुमच्या श्री मुखाचे दर्शन केव्हा होईल याची वाट पाहत आहे आणि तुमच्या दासांचा तुम्ही सांभाळ करावा एवढीच माझी मागणी आहे. माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याशिवाय माझा शिण कसा हलका होणार ? तुमच्या भेटीचा दिवस केव्हा येणार याची मी माझ्या काया वाचा मनाने आवड धरली आहे देवा तुम्ही या दासाचा कंटाळा करू नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा अंबरीशराजा आणि प्रल्हादाच्या वेळी तुम्ही तुमची वागणूक एकदमच सरळ केली होती पण मला एक कळत नाही की माझ्या वेळी तुम्ही तुमची वागणूक अशी उलटी का केली आहे, अशी तुमची वागणूक का झाली.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग