वाचेते वदवी रसनेते च
1379.
वाचेते वदवी रसनेते चाखती ।
नेत्राते दाखवी परि त्या दुरी ॥१॥
बुध्दी बोधविता चित्ता चेतविता ।
देही देहातीता कैसेनि दावू ॥२॥
भावाभावातीत अव्दैता अव्दैत ।
ज्याते म्हणत नेति नेति ॥३॥
निळा म्हणे काही न होऊनिया जे आहे ।
दाविती त्याचि सोय सद्गुरु संत ॥४॥
