नामदेवा काय करिसी ती
1383.
नामदेवा काय करिसी तीळ तुळसी | उभा गा ठेलासी दर्भ जैसा ॥१॥
भुका कागा मरसी जेथिचा तेथे | केशवराज तूते आतुडेना ॥२॥
नाही दया ध्यान ईश्वरी भजन | वायांविण प्राण का करितोसी ॥३॥
हरिभक्तिविण जन्मलासी नरू | म्हणे विसोबा खेचरू अरे नाम्या ॥४॥
