वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

बोलावे म्हणून बोलतो

🙏 3. संत तुकाराम · ABH-079082 · अभंग क्र. १३८८

1388.
बोलावे म्हणून बोलतो उपाय । प्रवाहे हे जाय गंगाजळा ॥१॥
भाग्ययोगे कोणा घडेल सेवन । कैचे येथे जन अधिकारी ॥धृपद॥
मुखी घेता घास पळविती तोंड । अंगीचिया भांड असुखाने ॥२॥
तुका म्हणे पूजा करितो देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥३॥

अर्थ :
गंगेचा प्रवाह वाहत असतो त्यामध्ये स्नान करण्याचा कोणी उपभोग घेऊ अथवा न घेऊ ते वाहा तच असते. त्याप्रमाणे हरिभक्ती का करावे हे सांगणे गरजेचे आहे म्हणून मी ते सांगत आहे. जे लोक खरे भाग्यवान आहेत तेच मी सांगितलेल्या उपदेशाचे अनुकरण करतील आणि येथे सर्वच लोक उपदेशाचे खरे अधिकारी आहेत असेही नाही. जे लोक अभागी आहेत त्यांच्या तोंडात हरी भक्तिचा गोड घास घालण्याचा प्रयत्न केला तरी ते तोंड मिटून पळण्याचा प्रयत्न करतात. तुकाराम महाराज म्हणतात मी मात्र माझ्या आवडीप्रमाणे देवाची पूजाअर्चा करतो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग