पांचा सातांचा आहे ये
1371.
पांचा सातांचा आहे येक जागा मेळा | देताती कवळा येकयेका ॥१॥
करू पाहाता मज जिताची विटंबना | म्हणोनी नारायेणा पळोनी आलो ॥२॥
पाहिला तयाचा मानस आदर जमा केला केर जाळावया ॥३॥
त्यांच्या धार्के मार्गे आलो रे अनंता | येत तुझ्या चित्ता बरे त्यांचे ॥४॥
नामा म्हणे जीवे आलो वांचवोनी | अझुनि तरी चक्रपाणि वांचवी मज ॥५॥
