श्याम चतुर्भुज पीतां
1382.
श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंख चक्र मिरवे करी ॥१॥
आला पुंडलिका कारणे । आवडी कीर्तने धरुनीं ॥२॥
युगे अठ्ठावीस जाली । न बैसे उभा सम पाउली ॥३॥
कीर्तनी धरुनिया हेत । उभा राहिला तिष्ठत ॥४॥
एका शरण जनार्दनी । अनुदिती करा किर्तन ॥५॥
