वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 176. गुरु करण्याविषयी विठ्ठलाचा नामदेवास उपदेश

देव आणि नामा उभे भीम

🙏 4. संत नामदेव · ABH-082530 · अभंग क्र. १३७६

1376.
देव आणि नामा उभे भीमातीरा | प्रेमे येरयेरा आळविती ॥१॥
देव म्हणे नाम्या ऐके गुह्य गोष्टी | संसाराची तुटी जेणे होये ॥२॥
श्रीगुरुवांचुनी मुक्ति तुज नाही | भवनदी डोही नुतरसी ॥३॥
शरण गुरुसी जालिया सप्रेमे संसाराचा श्रम उतरेल ॥४॥
गुरुवांचुनिया केंचा मुक्तिठाव | संसार हा बाव कैसा होय ॥५॥
म्हणूनि नाम्या तुवर गुरुसि जाये शरण | तेणे भवबंधने मुक्त होती ॥६॥
ऐसे ऐकोनिया नामा थरारिला | मूर्च्छागत जाला भूमीवरी ॥७॥
भूमि लोळे नामा कंठ सद्गदित डोळिया स्रवत अश्रुजळ ॥८॥
इतुके देखोनिया द्रवला पुरुषोत्तम | नाम्यासी सप्रे मे उचलिले ॥९॥
नाम्या तुज काय वाटतसे दुःख | संसाराचे सुख तुज जाले ॥१०॥
नामा म्हणे देवा तुज ऐसा दाता | मज भवव्यथा कवणेपरी ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग