कीर्तनाची देवा आवडी
1381.
कीर्तनाची देवा आवडी । म्हणोनी धांवे तो तांतडी ॥१॥
सुख कीर्तनींअद्भुत आहे । शंकरराज जाणताहे ॥२॥
गोडी सेविती संतजन । येरा न कळे महिमान ॥३॥
ऐसा कीर्तनसोहळा । एका जनार्दनी पहा डोळा ॥४॥