सगुण संपन्न पंढरीच्य
552.
सगुण संपन्न पंढरीच्या राया | आमुच्या स्वामिया केशिराजा ॥१॥
रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा | सज्जनी स्वानंदा सर्वातीता ॥२॥
गोविंद गोपाळ गोपवेशधारी | गोवर्धन धरी नखावरी ॥३॥
दुष्ट दुर्जनासी दु:ख फार चित्ता | पावन पतिता नामा म्हणे ॥४॥
