वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

सद्गुरुसारिखा सोयरा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074463 · अभंग क्र. ५५७

557.
सद्गुरुसारिखा सोयरा सज्जन ।
दाविले निधान वैकंठीचे ॥१॥
सद्गुरु माझा जीवाचा जिवलग ।
फेडियेला पांग प्रपंचाचा ॥२॥
सद्गुरु हा अनाथ माऊली ।
कृपेची साऊली केली मज ॥३॥
ज्ञानदेव म्हणे अवचित घडले ।
निवृत्तीने दिधले निजबीज ॥४॥

अर्थ :
सद्गुरुसारखा जीवलग, सज्जन, सोयरा नाही त्या श्रीगुरुरायांनी मला वैकुंठीचे निधान जो परमात्मा तो मला दाखविले. सदगुरु माझ्या जीवाचा जीवलग असून त्यांनी मला प्रपंचातून मुक्त केले. सद्गुरु हे अनाथ जीवाची माऊली असून, ती माऊली अनाथ जीवांवर आपल्या कृपेची सावली करीत असते. आकस्मिक गोष्ट अशी घडली की श्रीगुरु निवृत्तीरायांनी माझ्यावर कृपा करुन मला ब्रह्मस्वरुपाचे ज्ञान करुन दिले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग