आता यावरि संदेहपुरी
554.
आता यावरि संदेहपुरी ।
नका श्रीहरी लोटू मज ॥१॥
लाऊनिया आपुलिये कासे ।
न्या भलतैसे परपारा ॥२॥
कर्माची तो न कळे गती ।
नेणो पावविती कोण्या ठाया ॥३॥
निळा म्हणे तुमचे हाती ।
आहे श्रीपति मोकळिक ॥४॥
554.
आता यावरि संदेहपुरी ।
नका श्रीहरी लोटू मज ॥१॥
लाऊनिया आपुलिये कासे ।
न्या भलतैसे परपारा ॥२॥
कर्माची तो न कळे गती ।
नेणो पावविती कोण्या ठाया ॥३॥
निळा म्हणे तुमचे हाती ।
आहे श्रीपति मोकळिक ॥४॥