चालले पंढरी महादेवाह
549.
चालले पंढरी महादेवाहूनी ।
संतांचे दरूषणी सुख वाटे ॥१॥
संतसमागम जीवाहुनी गोड ।
परी भय दृढ भ्रताराचे ॥२॥
जमदग्नीचा क्रोध ऐकियला कानी ।
भ्रतार तो जनी तेचि रूप ॥३॥
बहिणी म्हणे झाले वरूचे एकादश ।
क्षणही जीवास सुख नाही ॥४॥
