कांचीपुरी राजा नामे
562.
कांचीपुरी राजा नामे सोमदत्त | तयाचे संपत्ती पार नाही ॥१॥
पूर्वपुण्यबळे लाधले तयासी| देता उपमेसी उणा शुक्र ॥२॥
पांचशते तया कामिनी सुंदरा | करिता नाही पुरा जाला काम ॥३॥
ऋद्धि सिद्धि घरी कामारि हिडती | धैर्य शौर्य कीर्ति ज्याची जगी ॥४॥
नामा म्हणे जेथे उणे कांही नाही| ऐसे असोनिही न सुटे भोग ॥५॥
