आठविता तुमची लिळा ।
550.
आठविता तुमची लिळा ।
करिता दासाचा सोहळा ॥१॥
ऐसा स्वाभाविक गुण ।
वसे तुम्हा अंगी पूर्ण ॥२॥
शरणागताचिया नांवे ।
तुम्हा उत्साह दुणावे ॥३॥
निळा म्हणे वत्सा धेनु ।
जेवि पान्हावे देखोनु ॥४॥
550.
आठविता तुमची लिळा ।
करिता दासाचा सोहळा ॥१॥
ऐसा स्वाभाविक गुण ।
वसे तुम्हा अंगी पूर्ण ॥२॥
शरणागताचिया नांवे ।
तुम्हा उत्साह दुणावे ॥३॥
निळा म्हणे वत्सा धेनु ।
जेवि पान्हावे देखोनु ॥४॥