सोसियेले क्लेश जीवे
555.
सोसियेले क्लेश जीवे बहु फार ।
जाली हे अपार दीन सख्या ॥१॥
चित्ती समाधान केले असे एक ।
प्रारब्धे हे दुःख आले भागा ॥२॥
भोगणे न चुके ब्रह्मादिका दुःख ।
इतर हे रंक कोण तेथे ॥३॥
बहिणी म्हणे माझ्या देहाचे प्रारब्ध ।
ऐसिया गोविंद काय करी ॥४॥
