आता पुरवा मनींचा हेत
552.
आता पुरवा मनींचा हेत ।
करा हे उदित भेटीसी ॥१॥
रुप पहावया डोळे ।
माझे भुकेले बहु काळ ॥२॥
चरण वंदावया भाळ ।
करी तळमळ अखंड ॥३॥
निळा म्हणे पुरवा कोड ।
जाणा चाड अंतरीची ॥४॥
552.
आता पुरवा मनींचा हेत ।
करा हे उदित भेटीसी ॥१॥
रुप पहावया डोळे ।
माझे भुकेले बहु काळ ॥२॥
चरण वंदावया भाळ ।
करी तळमळ अखंड ॥३॥
निळा म्हणे पुरवा कोड ।
जाणा चाड अंतरीची ॥४॥