ज्याकारनें योगे रिघत
564.
ज्याकारनें योगे रिघती कपाटीं । तो उभा असे ताटीं चंद्रभागे ॥१॥
सांवए रुपडें गोजिरे गोमटें । धरिले दोन्ही विटे समचरण ॥२॥
वैजयंती माळा तुळशीहार मिरवला । निढळीं शोभला चंदन वो माय ॥३॥
एका जनार्दनी मौन्य धरुनी उभा । चैतान्याचा गाभा पाडुरंग ॥४॥
