तेव्हा प्रश्न करी पा
557.
तेव्हा प्रश्न करी पार्वती आदरे | शिवाप्रती कर जोडोनिया ॥१॥
सांगावा जी स्वामी ऐसा इतिहास| गाता जोडे वास तुझे पायी ॥२॥
जाळोनिया पापे सुखाची उन्नति | विश्व सुखी होती जेणे योगे |॥३॥
नामा म्हणे सुटे काळासी दरारा| विश्वासिया नरा मुक्ति जोडे ॥ ४
