वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › २. सार्थ अभंग ५०१ ते १०००

ध्याई अंतरिच्या सुखे

🙏 3. संत तुकाराम · ABH-078678 · अभंग क्र. ५५१

551.
ध्याई अंतरिच्या सुखे । काय बडबड वाचा मुखे ॥१॥
विधिनिषेध उर फोडी । जव नाही अनुभवगोडी ॥धृपद॥
वाढे तळमळ उभयता । नाही देखिले अनुभविता ॥२॥
अपुलाल्या मते पिसे । परि ते आहे जैसेतैसे ॥३॥
साधनाची सिद्धी । मौन करा स्थिर बुद्धी ॥४॥
तुका म्हणे वादे । वाया गेली ब्रम्हवृंदे ॥५॥

अर्थ :
हृदयातील (अंतरातील) हरीचे ध्यान करा. मुखाने व्यर्थ बडबड करण्यात कायअर्थ : आहे. हरीचे सतचिदआनंदाची जो पर्यंत अनुभूती येत नाही, तो पर्यंत विधिनिषेधांच्या चक्रात फिरून डोक्याला फार त्रास होत असतो. अंतरंगात हरी प्रेमाची बासरी वाजवीत आहे ती जो पर्यंत ऐकू येत नाहि, तो पर्यंत हृदयाची तळमळ वाढत असते. मनुष्य आपल्याचं विचाराने भारलेला असतो, त्याच प्रमाणे वागतो. त्यामुळे त्याची प्रगती होत नाही. तो आहे त्या स्थितीत राहतो. तुम्ही मौन धारणा करा हरीचे चिंतन करा. बुद्धी स्थिर करा. यातच सर्व साधनाची सिद्धी आहे. तुकाराम महाराज म्हणतात विविध तऱ्हेचे व्यर्थ वाद करून काही ब्रम्‍हवृंद वाया गेले आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग