वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

काय पाप केले पूर्वील

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075954 · अभंग क्र. ५५४

554.
काय पाप केले पूर्वील ये जन्मी ।
आता पुरूषोत्तमी अंतरले ॥१॥
लाधले नरदेह स्त्रियेचेनि रूपे ।
असंख्यात पापे फळा आली ॥२॥
अधिकार नाही वेदार्थश्रवणी ।
गायत्री ब्राह्मणी गुप्त केली ॥३॥
करू नये मुखे प्रणवाचा उच्चार ।
बीजाचा संचार ऐको नये ॥४॥
बोलो नये बोल पराचिया संगे ।
भ्रतार तो अंगे जमदग्नी ॥५॥
बहेणि म्हणे होतो जीव कासावीस ।
न ये देवाजीस करूणा माझी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग