वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

एके दिनी रत्नसिंहासन

🙏 4. संत नामदेव · ABH-083612 · अभंग क्र. ५५६

556.
एके दिनी रत्नसिंहासनावरी| कैसा त्रिपुरारी शोभतसे ॥१॥
सांगो जाता चारही वाचा विसावती | तेथे माझी मति काय सांगो ॥२॥
वामभागी साजे सुंदरी भवानी| सिद्ध ऋषि मुनी करिती सेवा ॥३॥
नारद तुंबर गर्जती गायन | तेथे कर जोडोन उभे देव ॥४॥
गणेश सन्मुख ढाळिती चामरे| ऋद्धिसिद्धि द्वार राखिताती ॥५॥
नामाचा गजर मृदंगाची घाई| पाहाती नवाई ब्रह्मादिक ॥६॥
नामा हाडपे करी देतसे विडिया| लागोनिया पाया वारंवार ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग