तुटले संचित जाले शुद
563.
तुटले संचित जाले शुद्ध चित्त ।
अंतरीचा हेत ओळखिला ॥१॥
कृपा केली देवे इंद्रायणीतीरी ।
देहुग्रामी थार भक्तिपंथ ॥२॥
तेथे पांडुरंग देवाचे देऊळ ।
रहावया स्थळ प्राप्त झाले ॥३॥
तुकाराम संत संताचे कीर्तन ।
तिन्ही काळ तीन दृष्टीपुढे ॥४॥
नमस्कार तया न घडे पतिभये ।
परि चित्त राहे सदा पायी ॥५॥
तुकाराम कथा करावी ती द्वारी ।
ऐसा हा अंतरी हेत होता ॥६॥
बहिणी म्हणे ऐसे मास झाले सात ।
अवघेचि संचित सरो आले ॥७॥
