परब्रह्मा पुतळा कौस्
550.
परब्रह्मा पुतळा कौस्तुभ गळा । वैजयंती माळा कंठी शोभे ॥१॥
शंख चक्र गदा पद्म शोभा करी । पीतांबरधारी चतुर्भुज ॥२॥
कटी कडदोर वाळे वाक्या पायी । सुंदर रुप कान्हाई शोभता ॥३॥
लेणीयाचे लेणे भुषण साजिरे । एका जनार्दनी गोजिरे चरण दोन्ही ॥४॥
