शिणले ते वेद श्रुती
563.
शिणले ते वेद श्रुती पै भांडती पुराणांची मती कुंठीत जाहली ॥१॥
तो हा पांडुरंग उभा विटेवरी । पाउले साजिरी समचि दोन्ही ॥२॥
कर कटावरी तुळशीच्या माळा । निढळीं शोभला मुकुट तो ॥३॥
एका जनार्दनी गोजिरे ते ठाण । शोभले जघन करयुगुली ॥४॥
