कैलासीचा देव भोळा चक
554.
कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती| पार्वतीचा पति योगिराज ॥१॥
तयाचिया पाया माझे दंडवत| घडो आणि चित्त जडो नामी ॥२॥
जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळीं| तिजा नेत्रज्वाळी जातवेद ॥३॥
कंठी काळकूट डोर त्रिशूळ हातीं| सर्वांगी विभूति शोभतसे ॥४॥
गळा रूंडमाळा खापर हस्तकीं| रामनाम मुखी सर्वकाळ ॥५॥
व्याघ्रचर्मधारी स्मशानी राहिला| संगे भूतमेळा विराजित ॥६॥
नामा म्हणे नामे नासोनिया पाप| करी सुखरूप भक्तांलागी |॥७॥
