वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

सुवर्णाचे भाडे दुधाच

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074453 · अभंग क्र. ५५५

555.
सुवर्णाचे भाडे दुधाचे आधण ।
कुसुंबा घालुनी नाश केला ॥१॥
तोडुनि चंदन कर्दळीचे वन ।
बाभुळा रक्षण बैसविले ॥२॥
उत्तम भूमिका कमाविली पाही ।
धोत्रा लवलाही पेरियेला ॥३॥
ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे ।
शरण रिघावे सदगुरुसी ॥४॥

अर्थ :
सोन्याच्या भांड्यात दूध तापवून त्यात कुसुंबा टाकून ते जसे नासवून टाकावे, किंवा चंदनाचे व केळीचे वन तोडून त्याठिकाणी बाभळीची झाडे लावून त्याच्या रक्षणाकरिता रक्षक बसवावे. जमिनीची उत्तम मशागत करुन त्यात धोत्रा पेरणे अशा गोष्टी जशा मूर्खपणाच्या ठरतील त्याप्रमाणे हा महान भाग्याने प्राप्त झालेला मनुष्यजन्म केवळ विषय सेवनांत घालविला तर मूर्खपणाचाच ठरेल. असे मूर्खपणाचे कृत्य करु नये. तर मनुष्याने सद्गुरुला शरण जाऊन आपल्या जन्माचे सार्थक करुन घ्यावे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग