पंढरी ज्ञानिया ध्यात
550.
पंढरी ज्ञानिया ध्याता लक्षा नये | आम्हा वाट पाहे अनाथांची ॥१॥
जपकांचे जाप्य नाना मंत्रमय | आम्हा भक्ति प्रिय भावे सारी ॥२॥
पुंडलिकासाठी वोळला वोरसें| नेणो काय कैसे प्रेम त्याचे ॥३॥
नामा म्हणे जीवे करू निंबलोण | झणी नारायणा दिठावसी ॥४॥
