डवरला गिरी कैलास ढवळ
555.
डवरला गिरी कैलास ढवळा | सिंहासन ज्याला ढवळेची ॥१॥
पाहता पाहता निवाले लोचन | भव्य ज्याचे ध्यान एकरूप ॥२॥
ढवळा सर्वांगी देव तो आपण लेईला भूषण ते हि तैसे ॥३॥
पर्वताची बाळा पार्वती ढवळी| अर्धांगी शोभली एकरूप ॥४॥
सर्वांगी लाविली ढवळी विभूति | माळा विराजती स्फटिकांच्या ॥५॥
पांढरिया जटेमध्ये गंगा आहे श्वेत | गळघांत शोभत श्वेत सर्प ॥६॥
शंखपाळ श्रवणे कुंडले ढवळी | देखता भूतळी दुजा नाही ॥७॥
नामा म्हणे ऐसे दाऊनिया ध्यान| भाविकांचे मन तोषवित ॥८॥
