वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

चंद्रभागा तटीं उभा व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084362 · अभंग क्र. ५५९

559.
चंद्रभागा तटीं उभा वाळुवंटीं । वैजंयतीं कंठी शोभतसें ॥१॥
गोमटें साजिरे सुकुमार ठाण । धरिले जघन करे दोन्ही ॥२॥
राहीरखुमाई शोभतीवामभागी । शोभे उटी सर्वांगी चंदनाची ॥३॥
मोर पिच्छ शिरी शोभती ते वरी । केशर कस्तुरी शोभे भाळी ॥४॥
शंख चक्र गदा पद्म ते शोभती । सावळी हे मुर्ति विटेवरी ॥५॥
शोभती भुषणें चरणी वाळे वाकीं । जानु जंघा शेखी शोभताती ॥६॥
एका जनार्दनी वर्णिता ध्यान । मनाचे उन्मन सुखें होय ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग