प्रारब्धाची गती न सं
557.
प्रारब्धाची गती न संडी सर्वथा ।
व्यर्थ आता चिंता कोण वाहे ॥१॥
निश्चय निर्धारी धरियला मनी ।
आता चक्रपाणी पांडुरंग ॥२॥
शरीराचे क्लेश निवारे न कोणा ।
अगा नारायणा कळो आले ॥३॥
बहिणी म्हणे आता केशवा शरण ।
नको माझे मन पाहू हरी ॥४॥
