वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

त्रिवेणींचे स्नान अख

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074412 · अभंग क्र. ५५४

554.
त्रिवेणींचे स्नान अखंडित करा ।
काशीवासी मरा ज्ञानेवीण ॥१॥
तया नाही गती वस्ती निरंजनी ।
भोगी रुद्रयोनी कर्मवसे ॥२॥
लिंगदेहभंग जव झाला नाही ।
तोवरी बा पाही मुक्ती कैची ॥३॥
ज्ञानदेव म्हणे करावे सुमन ।
तरीच चिद्घन पाविजे तो ॥४॥

अर्थ :
तुम्ही त्रिवेणीचे अखंडित स्नान करा, नाही तर काशीत मरा पण ज्ञाना वाचून निरंजन परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गती होणे शक्य नाही. पवित्र त्रिवेणीचे किंवा काशीवासा सारखे पुण्य कर्म केले आहे म्हणून तो त्या पुण्यकर्माच्या योगाने रुद्रयोनी भोगेल. पण हे निश्चित आहे. जोपर्यंत दशेंद्रिय, पंचप्राण आणि सोळावे अंतःकरण मिळून जो लिंगदेह आहे त्याचा नाश झाला नाही. तोपर्यंत त्याला मुक्ति कशी मिळणार. जर अंतःकरण शुद्ध केले. तरच ज्ञानस्वरुप परमात्म्याची प्राप्ती होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग