वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

मातापिता बंदु प्रपंच

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076292 · अभंग क्र. ५५८

558.
मातापिता बंदु प्रपंचाचे सखे ।
होती महादुःखे माझ्या संगे ॥१॥
देवासी सांगता जाणसी अंतर ।
सांगावया थार नाही मज ॥२॥
सांगती न कोणी स्वहितविचार ।
नाही तो शेजार सज्जनाचा ॥३॥
एकली एकट पडियले वनी ।
क्षुधा तृषा मनी आठवेना ॥४॥
बोलावे न ऐसे वाटे कोणासवे ।
विचार केशवे करावा हा ॥५॥
बहिणी म्हणे नाम तुझे जाणे एक ।
कोणासी आणिक सांगू हरी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग