उभा भीमातीईं कट धरुन
558.
उभा भीमातीईं कट धरुनी करी । वैकुंठीचा हई मौनरुप ॥१॥
ठेविनिया विटेसम पद दोन्ही । उभा चक्रपाणी मौनरुपें ॥२॥
वैजयंती माळ किरीट कुंडले । निढळ शोभले केशरानें ॥३॥
कांसे पीतांबर दिसे सोनसळा । पदक आणि माळा कौस्तुभ ते ॥४॥
चरणींचा तोडर एका जनार्दन । करीत स्तवन भक्तिभावें ॥५॥
