वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

स्त्रियेचे शरीर पराध

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076301 · अभंग क्र. ५५३

553.
स्त्रियेचे शरीर पराधीन देह ।
न चाले उपाव विरक्तीचा ॥१॥
पडिले अंतर विवेकाचे बळे ।
काय निर्मियेले राघोबाने ॥२॥
तापले शरीर तिविध तापाने ।
वाटतसे मने प्राण द्यावा ॥३॥
न घडे हरिची भक्ती अणुमात्र ।
शत्रु इष्टमित्र संसाराचे ॥४॥
शरीराचे भोग वाटताती वैरी ।
माझी कोण करी चिंता आता ॥५॥
बहिणी म्हणे जैसा वोकियला वोक ।
तैसे हे मायिक वाटे मना ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग