वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

एक माझी माता दोघेजण

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074443 · अभंग क्र. ५५६

556.
एक माझी माता दोघेजण पिता ।
मज तीन कांता दोघे सुत ॥१॥
चौघे बंधु आणि दशक बहिणी ।
कन्या झाल्या तिन्ही माझ्या पोटी ॥२॥
बहिणी भावासंगे खेळू पै लागले ।
विपरीत झाले सांगू कोणा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे अघटित घडे ।
गुरुकृपा जोडे परब्रह्म ॥४॥

अर्थ :
मला जीवत्वदशा देणारी अविद्या ही एक आहे. आत्मा व अंतःकरणात पडलले प्रतिबिंब म्हणजे चिदाभास हे दोन माझे दोन वडील आहेत. जागृति स्वप्न व सुशुप्ती ह्या या तीन बायका आहेत. प्रवृत्ति व निवृत्ति हे दोन माझी मुले आहेत. मन बुध्दी चित्त अहंकार हे माझे चार भाऊ आहेत. दहा इंद्रियांच्या दहा वृत्ति ह्या बहिणी आहेत बाल, तरुण, व वृद्ध या तीन अवस्था माझ्या मुली जेव्हा बहिण भावासंगे खेळू लागल्या तेव्हा काय विपरीत झाले कोणास ठाऊक. जीवाला ब्रह्मस्वरुपता प्राप्त होणे ही जी अघटीत गोष्ट आहे ती देखील गुरुकृपेने घडून येईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग