वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

भ्रमरीच्या ध्यासे भ्

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074430 · अभंग क्र. ५६०

560.
भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होय ।
कीटकत्व जाय पालटोनी ॥१॥
ब्रह्म ध्यासे स्वये ब्रह्मचि होईजे ।
जीवत्व लोपिजे सहजची ॥२॥
किडाळ त्यजिले चोखाळचि नाही ।
आणि हे पाही अनादिची ॥३॥
जुनाटचि आहे जाणा सोयरिक ।
माया उपाधिक भ्रमलाशी ॥४॥
विचार करिता सर्व एकाकार ।
म्हणे ज्ञानेश्वर सत्ययोगी ॥५॥

अर्थ :
ज्याप्रमाणे भिंगोट्याच्या घरांत असलेली अळी भिंगोटा आपल्याला मारील या भीतीने ध्यास घेऊन भिंगोटाच बनते. त्याप्रमाणे मी ब्रह्म आहे असा ध्यास घेऊन ब्रह्म होऊन जा. म्हणजे सहज जीवपणा नष्ट होईल. हीणकट पणा गेला म्हणजे. उत्तम सोन्यावांचून दुसरे काहीच नसते. जीवब्रह्माची एकता अनादि आहे, पण मायेच्या उपाधीने जीव भ्रमिष्ट झाले आहेत. विचार करुन सर्व जीव ब्रह्मरुप आहेत. असे जो जाणतो. तोच खरा योगी असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग