वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

सगुण निर्गुण दोन्ही

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074409 · अभंग क्र. ५५९

559.
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ।
ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥१॥
पतीतपावन मान समोहन ।
ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ।
ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्घन ।
ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥४॥

अर्थ :
आमची उपास्य देवता जो श्रीविठ्ठल तो सगुण निर्गुणाहून विलक्षण ब्रह्म आहे. तसेच तो पतितपावन, मनाला मोहून टाकणारा विठल आहे. ध्याता, ध्यान व ध्येय याहून वेगळा तो अनादि सिध्द असा आहे. सच्चिदानंद स्वरुप अनादि सिद्ध जे ब्रह्म तोच आमचा श्री विठ्ठल आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग