वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

नामाचा विटाळ आमुचिये

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076027 · अभंग क्र. ५५१

551.
नामाचा विटाळ आमुचिये घरी ।
गीताशास्त्र वैरी कुळी आम्हा ॥१॥
देव तीर्थयात्रा नागडती हरी ।
ऐसीयांचे घरी संग दिला ॥२॥
संतसमागम राघवाची भक्ती ।
नावडती श्रुती शास्त्र कथा ॥३॥
बहिणी म्हणे माझ्या पापाचा संग्रहो ।
तुटोनीया राहो चित्त स्थिर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग