वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

मातापितयाने लग्न संप

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076099 · अभंग क्र. ५४८

548.
मातापितयाने लग्न संपादिले ।
कन्यादान केले गौतमगोत्री ॥१॥
झाला चार दिस लग्नाचा सोहळा ।
न कळे देवाचा हेत आन ॥२॥
मायबापे माझी दरिद्री पीडिली ।
उपद्व्यापे जाली कासावीस ॥३॥
देशत्याग झाला मिरासीच्या भये ।
तव गंगा जाय दोही थड्या ॥४॥
सांगाते घेतले माझिया स्वामीस ।
आले परदेशास महादेवी ॥५॥
मायबाप बंधू भ्रतारासहित ।
बहिणी म्हणे तेथ स्थिर जाले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग