वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

अनुतापे तापले बहुत म

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076401 · अभंग क्र. ५६१

561.
अनुतापे तापले बहुत मानसी ।
नये देवाजीसी करूणा कैसी ॥१॥
वाटे देह आता घालू अग्नी-आत ।
किंवा ही करवत घालू माथा ॥२॥
वाटे जीव द्यावा नदीचे प्रवाही ।
किंवा दिशा दाही उल्लंघाव्या ॥३॥
वाटे अरण्यात घेऊनी धरणे ।
बैसावे, पारणे करू नये ॥४॥
बहिणी म्हणे माझा जीव हा तळमळी ।
का रे वनमाळी मोकलिसी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग