वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

विरक्तीचे मूळ प्रपंच

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075786 · अभंग क्र. ५६०

560.
विरक्तीचे मूळ प्रपंचाचा त्याग ।
पाहतांची एक गृहशैल ॥१॥
संकट मांडिले धाव तू झडकरी ।
विवेक-उत्तरी बोधी चित्त ॥२॥
भ्रतार त्यागिता वेदासी विरूद्ध ।
परमार्थ तो शुद्ध सापडेना ॥३॥
द्वाराशी भुजंग प्रहजळे अंगी ।
जीव त्या प्रसंगी केवी राहे ॥४॥
वेदाचे वचन त्यागू नये धर्म ।
माझे तव प्रेम हरिभक्ती ॥५॥
बहिणी म्हणे ऐशी संकटे दाटती ।
क्लेश ते वाढती काय सांगू ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग