वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

नवजावे तेथे लागे जाण

🙏 4. संत नामदेव · ABH-083750 · अभंग क्र. ५४८

548.
नवजावे तेथे लागे जाणे | न करावे तेंचि लागे करणे |न बोलावे त्यासि लागे बोलणे | पडणे मागणे नेदी तया ॥१॥
कृष्णे देवकीये उदरा येणे | कंसा भेणे त्वा गोकुळासि जाणे |तेथे नंदाच्या गाई राखणे | संगती असणे गोंवळ्यांच्या ॥२॥
रण वानराची सेवा करी | पांडव किंकर विराटा घरी |हरिश्चंद्र डोंबा घरी पायकी करी | हे अपूर्व परियेसा ॥३॥
रुद्रे अंजनी उदरा येणे | रामाची सेवा वानरपणे |प्रसंग पडे तैसे वर्तणे | रूसणे न लगे कवणासी ॥४॥
स्वामीने सेवकाची सेवा करणे | नुपेक्षी कदान्न भक्षणे |म्हणवूनि अहंकार न धरणे | विषम संसार अरे जना ॥५॥
अवचट घडविती तुझिया भावा | घोर विस्मय होतो माझिया जीवा |विष्णुदास नामा विनवी केशवा | देवा तू करिसी ते बरवे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग