वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

वेद हाका देती पुराणे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076355 · अभंग क्र. ५५२

552.
वेद हाका देती पुराणे गर्जती ।
स्त्रियेच्या संगती हित नोहे ॥१॥
मी तो सहज स्त्रियेचाचि देह ।
परमार्थाची सोय आता कैची ॥२॥
मूर्खत्व ममता मोहन मायिक ।
संगची घातक स्त्रियेचा तो ॥३॥
बहिणी म्हणे ऐसा स्त्रीदेह घातकी ।
परमार्थ या लोकी केवी साधे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग